The news is by your side.

यवतमाळ जिल्ह्यात ८ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; ७ जणांचे ‘तबलिगी’ कनेक्शन उघड

0

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात असलेल्या आठ जणांची कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक म्हणजे या पैकी सात जणांचे दिल्लीतील निझामुद्दीन येथील ‘तबलिगी’ कनेक्शन समोर आले आहे. तर एक रुग्ण दुसऱ्या राज्यातील आहे.

या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचे रुग्ण आढळलेल्या गुलमोहर कॉलनी, भोसा रोड, मेमन कॉलनी, परिसर पूर्ण पणे सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंग, पोलीस अधीक्षक एम.राज. कुमार यांनी या भागात भेट देऊन परिसराची पाहणी केली. परिसर निर्जंतुकिकरण करणे सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.