The news is by your side.

नाशिक जिल्ह्य़ातील पूर्वेकडील पाणी मराठवाडय़ाला देण्यासाठी प्रयत्न करू-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

0

नाशिक जिल्ह्य़ातील पूर्वेकडून जाणारे पाणी मराठवाडय़ाला मिळावे यासाठी लक्ष घातले आहे आणि ते मराठवाडय़ाला कसे देता येईल याबाबत प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला सात टीएमसी पाण्यासाठी बोगद्याचे काम प्रगतिपथावर असून त्यालाही निधी दिला जाईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. नदीजोड प्रकल्पांतर्गत पाणी देण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. ती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.