The news is by your side.

गिर्यारोहणाकडे वळलेल्या परमेश्वर मुंडे यांनी पुन्हा घेतला रुग्णसेवेचा वसा

0

130 कोटी भारतीय न दिसणाऱ्या कोरोना या व्हायरसरूपी शत्रूचा सामना करतायत. कोरोनाने अचानक आक्रमण केल्याने संपूर्ण देश ठप्प झाला आहे. मात्र, कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपली ढाल बनलेत, डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी. जीवाची पर्वा न करता देशवासीयांसाठी रणांगणात आरोग्य कर्मचारी उतरले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोनाची राजधानी बनतेय आणि केंद्रस्थानी आहे मुंबईचं कस्तुरबा रुग्णालय आहे. कस्तुरबा रुग्णालयात रुग्णसेवेचं व्रत घेतलेला एक डॉक्टर दिवसरात्र झटतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल खरंतर, या डॉक्टरने डॉक्टरकी सोडून दिली होती. पण आता एका योद्ध्यासारखा लढणाऱ्या 25 वर्षाच्या या डॉक्टरचं नाव, डॉ. परमेश्वर मुंडे आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.