The news is by your side.

कोरोना व्हायरसमुळे राज्यावर आर्थिक संकट; आतापर्यंत ३५ हजार कोटींचा फटका

0

करोनाच्या साथीमुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने उद्योग-व्यापार उदीम, घरांची खरेदी-विक्री असे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झालेत. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला करोनाचे चटके बसले असून मार्च 2019 च्या तुलनेत यंदा मार्च मध्ये जवळपास 25 हजार कोटींचा फटका बसला. आर्थिक वर्षांचा विचार करता 2019-20 मध्ये अपेक्षित महसुलापेक्षा सुमारे 35 हजार कोटींचा फटका बसला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. मार्च 2019 मध्ये राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे 42 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.