The news is by your side.

स्वच्छ प्रतिमेऐवजी कलंकितांना तिकीट का दिले हे पक्षांनी सांगावे -सुप्रीम कोर्ट

0

राजकारणात वाढत असलेल्या गुन्हेगारांच्या संख्येला आवर घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाला १७ महिन्यांत दुसऱ्यांदा निर्देश द्यावे लागले आहेत. गुरुवारी कोर्टाने सर्व राजकीय पक्षांना असे निर्देश देताना म्हटले आहे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची निवड का केली हे राजकीय पक्षांनी निवडणुकीदरम्यान प्रमुख माध्यमांसह सोशल मीडिया व वेबसाइटच्या माध्यमातून जनतेला सांगावे. त्याच्याऐवजी स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला तिकीट का दिले नाही, हे कारणही सांगावे लागेल. निर्देश न पाळणाऱ्या पक्षांवर अवमाननेची कारवाई होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.