The news is by your side.

ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष जॅक डॉर्सी एक बिलीयन डॉलरची मदत करणार

0

ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी करोनाविरुद्धच्या लढाईसाठी एक बिलीयन डॉलर (अंदाजे ७ हजार ६२० कोटी) मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. डॉर्सी यांनी यासाठी स्क्वेअर इन, या कंपनीमधील त्यांची मालकी हक्क विकून पैसे उभे करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. डॉर्सी हे स्क्वेअरचे सहसंस्थापक असून सध्या तेच कंपनीचे नेतृत्व करत आहेत. ही कंपनी डिजीटल पेमेंट क्षेत्राशी संबंधित काम करते.

डॉर्सी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच ही माहिती दिली आहे. आपल्या एकूण संपत्तीपैकी २८ टक्के वाटा हा करोनाविरुद्धच्या लढाईसाठी दान करणार असल्याचे यामध्ये डॉर्सी यांनी नमूद केलं आहे. ही मदत अशा संस्थांना देण्यात येणार आहेत ज्या जगभरामध्ये हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन कमाईसंदर्भात काम करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.