The news is by your side.

भाजपची ‘दीनदयाळ थाळी’ सुरू

0

शिवसेनेने शिवभोजन थाळी सुरू केल्यानंतर आता भाजपने त्याला उत्तर म्हणून दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. पंढपुरातून दीनदयाळ थाळीला सुरुवात केली आहे. अवघ्या ३० रुपयांत ही थाळी दिली जात आहे.

पंढपुरातील काही महिलांनी श्री महिला उद्योग या संस्थेची स्थापना केली होती. या महिलांनी शेंगदाणा लाडू, पापड आणि इतर खाद्यपदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली होती. भाजपने या महिलांनासोबत घेऊन दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. श्री विठ्ठल मंदिरापासून ५ मिनिटांच्या अंतरावर इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ या योजनेस आजपासून शुभारंभ झाला. ३ चपाती, १ भाताची मुद , १ वाटी भाजी, १ वाटी आमटी, १ वाटी ताक, लिंबू फोड, शेंग चटणी, लोणचे, पापड असे १० पदार्थ देण्यात येत आहेत. या थाळीची किंमत ३० रुपये आहे. दुपारी १२ ते १ या एक तासाच्या वेळेतच ही थाळी सर्वांना दिली जात आहे. विशेष म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक या थाळीचा लाभ घेत असून तासाभरात सुमारे ५०० भाविक या थाळीचा लाभ घेतील असं भाजपने सांगितलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या थाळीची सुरुवात झाली. भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्या पुढाकाराने ही थाळी सुरू करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.