Ultimate magazine theme for WordPress.

न्यायालयाकडून जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने नवनीत राणाची खासदारकी धोक्यात

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरविल्याने मोठा धक्का बसला असून त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. तसेच येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं समितीकडे जमा करावे असा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील निकाल दिला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ असून त्या मतदारसंघातून २०१९ साली नवनीत राणा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं आहे. त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.