Ultimate magazine theme for WordPress.

महाराष्ट्रात करोनामुळे झालेल्या बळींच्या संखेने एक लाखाचा आकडा पार केला

महाराष्ट्रात करोनामुळे झालेल्या बळींच्या संखेने एक लाखाचा आकडा पार केला असून ही संख्या १,००,१३० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात राज्यात २३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एक लाखापेक्षा अधिक करोना मृत्यू झालेले महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे समजते.

देशात करोनाची दुसरी लाट घातक ठरली असली तरी आता ही दुसरी लाट हळू हळू ओसरत आहे, तरीही तिचा धोका संपलेला नसून देशात आजही एक लाखापेक्षा अधिक संखेने संक्रमित सापडत असून दररोज सरासरी तीन हजार मृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सर्वाधिक महाराष्ट्रावर आहे.

महाराष्ट्र आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात १२५५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. १४४३३ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात एकूण संक्रमित संख्या ५५,४३,२६७ असून रिकव्हरी रेट ९५.०५ वर गेला आहे तर मृत्युदर १.७२ वर आला असून सध्या राज्यात १,८५,५२७ सक्रीय रुग्ण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.