Ultimate magazine theme for WordPress.

आता देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार

केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर सातत्याने विरोधकांकडून टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  महत्त्वाची घोषणा केली आहे. देशात जेव्हा लसीकरण कार्यक्रम सुरू झाले होते त्यावेळेस केंद्र सरकारने केवळ कोरोना योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांनी घेतली होती. मात्र, आता जागतिक योग दिनापासून म्हणजेच २१ जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार मार्फत मोफत करण्यात येणार आहे.

दरम्यान देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी पुन्हा तिसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे लशीच्या तुटवड्यावरून बहुतांश राज्यांमध्ये ओरड होत आहे. तसेच अनेक राज्यांनी जागतिक पातळीवर निविदा काढल्या असल्या तरी या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने आता विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही लसीकरणाच्या धोरणावरून केंद्र सरकारला झापल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासंदर्भात उपस्थित झालेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधून त्यांनी देशातील लस उत्पादन आणि लसीकरणाच्या वेगावरही सरकारची भूमिका मांडून १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार मार्फत मोफत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.