Ultimate magazine theme for WordPress.

SBI बँकेने ‘कॅश’ चे नियम बदलले; दिवसाला किती रक्कम काढता येणार ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) (SBI) ने अलिकडेच आपल्या ग्राहकांसाठी नवीन नोटिफिकेशन जारी केले असून ज्यामध्ये रोख रक्कम करण्याचे नवीन नियम सांगण्यात आले आहेत. यानुसार, आता नॉन-होम ब्रँचमधून रोकड काढण्याची मर्यादा वाढवली आहे, ग्राहक एका दिवसात पंचवीस हजार रुपये काढू शकणार आहेत.

एसबीआय (SBI) बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी ट्विट करत सांगितले की, कोरोना महामारीमध्ये आपल्या ग्राहकांचे समर्थन करण्यासाठी एसबीआयने चेक आणि पैसे काढण्याच्या फॉर्मच्या माध्यमातून नॉन-होम ब्रँचमधून रोकड काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता ग्राहक आपल्या जवळच्या ब्रँचमध्ये जाऊन एका दिवसात आपल्या बचत खात्यातून २५,००० रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात.

मात्र, चेकद्वारे कॅश काढण्याचे लिमिट एक लाख रुपयांपर्यंत असून थर्ड पार्टी म्हणजे ज्यास चेक जारी केला आहे, त्यांना पैसे काढण्याची मर्यादा वाढवून ५० हजार रुपये केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नोटिफिकेशननुसार, नवीन नियम ताबडतोब प्रभावी केले असून हे नियम ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागू राहतील. म्हणजे या महामारीत आता बँकेतून कॅश काढण्यासाठी सतत फेर्‍या माराव्या लागण्याची गरज पडणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.