Ultimate magazine theme for WordPress.

कोरोनाच्या काळातही पोलिसांच्या लाचखोरीच्या मोठ्या प्रमाणात घटना उघड

गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूने देशाला वेठीस धरलं आहे. दरम्यानच्या काळातील दोन-तीन महिने वगळता मागील दीड वर्षापासून देशात सातत्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. संपूर्ण देशाला कोरोना विषाणूने ग्रासलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहे. एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या लढ्यात व्यग्र असताना, देशात लाचखोरी आणि काळाबाजारीच्या घटनांना उत आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील दोन महिन्यात लाचखोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे.

ज्यांना कोरोना योद्धे म्हणून नावाजलं गेलं. याच दोन विभागात सर्वाधिक लाचखोरी झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं आहे. मागील दोन महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. असं असतानाही पुणे शहरात आणि जिल्ह्यात लाचखोरीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे जिल्ह्यांत एकूण २१ कारवाया केल्या आहेत. सापळा रचून केलेल्या कारवाईत अद्याप ३० जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहरात आणि जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मागील पाच महिन्यात सर्वाधिक लाचखोरी पुण्यात झाल्याचं निदर्शनास आलं आहे. पुणे जिल्ह्यातील २१ सापळा कारवायांपैकी ८ सापळा कारवाया पुणे शहरात झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.