Ultimate magazine theme for WordPress.

पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेजरची पत्नी बनली लष्करात रुजू झाली

पुलवामा हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले मेजर विभुतीशंकर धौंडीयाल यांच्या पत्नी निकीता कौल यांनी भारतीय सैन्यदलात प्रवेश मिळवला असून बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून त्यांनी लष्करी सेवेत दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर अवघड मानली जाणारी परीक्षा पास झाल्यानंतर एका वर्षाचं करून कठोर प्रशिक्षण पूर्ण करून निकीता यांनी हे यश मिळवलं आहे.

सनी दलातील वूमन स्कीमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून त्या भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. भारतीय लष्करात निकीता कौल यांची लेफ्टनंट पदावर नेमणूक करण्यात आली असून शनिवारी (दि. 29 मे) रोजी आयोजित भारतीय लष्कराच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये निकीता यांनी पहिल्यांदाच लष्करी गणवेश आपल्या अंगावर चढवला आहे. लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी निकीता कौल यांच्या खांद्यावर लष्कराचे स्टार लावून त्यांना लष्करी सेवेत दाखल करून घेतलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.