Ultimate magazine theme for WordPress.

तब्बल सहा आठवड्यानंतर देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठं थैमान घालत असतानाच नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील जागतिक विक्रमांची दुर्दैवी नोंद भारतात झाली. फेब्रुवारीपासून देशातील परिस्थिती भयावह होण्यास सुरूवात झाली. मार्च आणि एप्रिलमध्ये मृत्यूचे तांडवच बघायला मिळाले. दरम्यान या भयावह परिस्थिती हळहळू कमी होत असून, देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे आकडेवारीतून दिसत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांतील आकड्यामुळे दिलासादायक चित्र दिसत आहे. सहा आठवड्यानंतर देशात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. २४ तासांत देशात १ लाख ६५ हजार ५५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ लाख ७६ हजार ३०९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. सध्या देशात २१ लाख १४ हजार ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत. २४ तासांत आढळून आलेले रुग्णसंख्या ही ४६ दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.