Ultimate magazine theme for WordPress.

वापरलेले पीपीई किट घालून मनोरुग्ण रस्त्याने पायी फिरत असल्याने परळीत दहशत

राज्यात आणि संपूर्ण देशात कोरोना काळात स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र बीडजवळील परळी याठिकाणी घडलेल्या एका घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. परळी शहरात संध्याकाळी आणि एकदा सकाळच्या सुमारास एका वेडसर व्यक्ती चक्क वापरून फेकलेले पीपीई किट घालून फिरताना आढळून आली. परळीच्या रस्त्यावर अशाप्रकारे गाणं म्हणत फिरत असल्याने नागरिकांना धडकी भरली आहे.

दरम्यान या घटनेनंतर पीपीई किट, मास्क वापरून झाल्यावर त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे हे समोर आले आहे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून यापासून बचाव करण्यासाठी मास्क, पीपीई किट, हात मोजे वापरणे गजेचे आहे आणि याचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणेही तितकेच गरजेचे आहे. मात्र हा असा प्रकार घडल्यानंतर हे समोर येतं आहे की, परळी शहरात वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पीपीई किट उघड्यावर फेकणे धोकादायक ठरू शकते. कोरोनामुळे पीपीई कीट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.