Ultimate magazine theme for WordPress.

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेतील शारीरिक चाचणी गुण निकषात बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआयच्या मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्‍के गुण म्हणजेच ६० गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे.

आयोगाने पीएसआयच्या मुख्य स्पर्धेतील शारीरिक चाचणीच्या गुणांच्या निकषात बदल केला आहे. या गुणांचा अंतिम गुणवत्तेसाठी तथा अंतिम निवडीसाठी विचार होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णाकांत असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल. पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानकेही आयोगाने प्रसिद्ध केले आहे.

पुरुष उमेदवारांना गोळा फेकसाठी १५ गुण, पुलअप्ससाठी कमाल गुण २०, लांब उडीसाठी कमाल गुण १५ गुण, धावणे ८०० मीटरसाठी कमाल गुण ५० निश्‍चित केले आहेत. महिला उमेदवारांना गोळा फेकसाठी २० गुण, धावणे ४०० मीटर-कमाल गुण ५० गुण आणि लांब उडीसाठी कमाल गुण ३० निश्‍चित करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.