Ultimate magazine theme for WordPress.

महिंद्राच्या कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास ५ वर्षांचा पगार, मुलांचे शिक्षणाचा करणार

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याचं पाच वर्षांचं वेतन आणि वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. महिंद्राच्या कौटुंबिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत ही मदत दिली जाणार असल्याचे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी आपल्या कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.

तसेच आपल्या कर्मचार्‍यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे, ज्याअंतर्गत कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या बारावी इयत्तेपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत करेल. शाह यांनी एमअँडएमच्या २५,००० कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पीडित असलेल्या कुटुंबांवरील ओझं थोडं कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे, त्याचवेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.