Ultimate magazine theme for WordPress.

लॉकडाऊनमुळे राज्यातील व्यापार क्षेत्राला तब्बल ७० हजार कोटींचा फटका

पहिल्या लॉकडाऊन काळात व्यवसाय क्षेत्रावर याचे थेट परिणाम पाहायला मिळाले. त्यामागोमाग कुठं कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसल्यामुळं प्रशासनाकडून नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्यात आली. पण, यातच अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रक्रियेत पुन्हा एकदा नकळतच कोरोनाही फोफावू लागला. पाहता पाहता कोरोनाचं सावट आणखी गडद झालं आणि पुन्हा एकदा टाळेबंदी, अर्थाच लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय अवलंबला गेला. पण, याचे थेट परिणाम हे अर्थव्यवस्थेवर आणि राज्यातील व्यापार क्षेत्रावर झाले असल्याचे दिसून येत आहे.

5 एप्रिल पासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या लॉक डाऊन काळात जीवनावश्यक व अत्यावश्यक क्षेत्र वगळून अन्य सर्व व्यापारांवर शासकीय आदेशांवरुन निर्बंध लागू करण्यात आले. गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया हे दोन महत्त्वाचे सण लॉकडाऊन च्या काळात व्यापाराशिवाय गेल्यामुळं राज्याती व्यापार क्षेत्राला तब्बल ७० हजार कोटींच्या जवळपास फटका बसला आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय व्यापार महासंघाचे संघटनमंत्री ललित गांधी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. राज्यातील व्यापार क्षेत्र कायम असंघटित व अकुशल लोकांना सर्वाधिक रोजगार पुरवत असते. पण, हे क्षेत्र अडचणीत आल्यामुळं व्यापारी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कर्मचारी हे प्रचंड अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर या क्षेत्राला भरीव आर्थिक पॅकेज देण्याची मागणी ललित गांधी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.