Ultimate magazine theme for WordPress.

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय- टोपे

राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळेच राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम होते, त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून ३१ मे पर्यंत कायम ठेवण्याचे ठरवण्यात आलं आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची सर्वांनीच मागणी केल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यापूर्वी ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले कठोर निर्बंध या कालावधीत सुद्धा लागू असणार आहेत.

दरम्यान लॉकडाऊन लागू केल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला असून रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध आणखी १५ दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही बैठकीनंतर दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.