Ultimate magazine theme for WordPress.

विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला तिसरा डोस घेण्याची गरज पडेल- डॉ. रणदीप गुलेरिया

एकिकडे देशात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग दिला जातो आहे. १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरणही सुरू करण्यात आलं आहे. लस घेण्यासाठी पात्र असलेल्यांचं प्रमाण वाढलं आहे परंतु कोरोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकांनी कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करून ठेवूनही त्यांना लसीकरणाची वेळ मिळत नाही. कोरोना लशीचे दोन डोस अनिवार्य असून त्यात पहिला डोसही मिळणं अवघड झालं असतानाच भारतीय तज्ज्ञांच्या मते कदाचित तिसऱ्या डोसचीही गरज भासू शकणार आहे.

कोरोना (कोव्हिड-19) पासून सुरक्षा मिळण्यासाठी कदाचित कोरोना लशीचा तिसरा डोस घ्यावा लागेल, असं दिल्लीतील एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

डॉ. गुलेरिया म्हणाले कि, कोरोना लशीचा तिसरा डोस घ्यायचा की नाही हे दोन बाबींवर अवलंबून आहे. एक म्हणजे कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती किती काळ टिकते आणि दुसरं म्हणजे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना लशीचा प्रभाव झाला तर पुढील काही महिने आपल्याला हे पाहावं लागणार असून कोरोना लशीच्या तिसरा डोसबाबत अद्याप काही पुरेसा डेटा उपलब्ध नाही, परंतु मला वाटतं, की आता लगेच नाही पण एका विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला तिसरा डोस घेण्याची गरज पडेल, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.