Ultimate magazine theme for WordPress.

आपले ड्रायविंग लायसन्स घरबसल्या ऑनलाईन रिन्यूव कसे करता येईल ?

कोरोनामुळे (Corna Pandemic) अनेक कामं घरबसल्या ऑनलाईन होत आहेत. अशात जर तुमच्याकडे टू व्हिलर किंवा 4 व्हिलर असेल आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचं (Driving License renewal) असल्यास, केवळ काही स्टेप्स फॉलो करुन ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करता येऊ शकतं. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH), मार्चमध्ये एक निवेदन जारी करत, लायसन्ससंबंधी 18 कॉन्टॅक्टलेस सेवांना आधार प्रमाणीकरणाचा उपयोग करुन अ‍ॅक्सेस केलं जाऊ शकतं, असं सांगितलं. यात ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू देखील सामील आहे. यासाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही. घरबसल्या पेमेंट करुन ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूव करता येऊ शकतं.

या कागदपत्रांची गरज लागेल –

* सध्याचं ड्रायव्हिंग लायसन्स

* फॉर्म नंबर 1 ए (ट्रान्सपोर्ट व्हिकल्ससाठी मेडिकल सर्टिफिकेट)

* फॉर्म नंबर 1

* फॉर्म नंबर 2

* रिन्यूसाठी लागणारं शुल्क

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी –

> ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in/ वेबसाईटवर जावं लागेल.

> एक होम पेज सुरू होईल, इथे ऑनलाईन सर्विसवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्विसवर क्लिक करा.

> त्यानंतर एक नवं पेज ओपन होईल, तिथे आपलं राज्य निवडावं लागेल.

> राज्य निवडल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल, इथे अनेक पर्याय दिसतील. या पर्यायात ‘ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू’चा पर्याय निवडावा लागेल.

> ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूवर क्लिक केल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल, त्यात कोणते कागदपत्र जमा करावे लागतील हे सांगितलं जाईल. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

> ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी माहिती खाली दिलेल्या बॉक्समध्ये भरावी लागेल.

> माहिती भरल्यानंतर मागितलेले कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करावे लागतील.

> कागदपत्र अपलोड केल्यानंतर, तुमचा स्कॅन केलेला फोटो आणि सही अपलोड करावी लागेल. हे काही राज्यातच लागू आहे.

> त्यानंतर नवीन पेज ओपन होईल, इथे ऑनलाईन पेमेंट जमा करण्यासाठी सांगितलं जाईल.

> ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर एक रिसीप्ट जनरेट होईल, ती डाउनलोड करुन लॅपटॉप किंवा फोनमध्ये सेव्ह करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.