Ultimate magazine theme for WordPress.

गुगल फोटोची अनलिमिटेड फ्री बॅकअप सुविधा बंद १ जून पासून बंद होणार

गुगल फोटोज ( Google Photos) या गुगलच्या सेवेच्या युझर्सना आतापर्यंत मिळत असलेली फ्री स्टोरेजची सुविधा या महिनाअखेरीला बंद होत आहे. गुगल फोटोजवर दिली जाणारी अनलिमिटेड फ्री फोटो बॅकअप सुविधा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा गुगलने गेल्या वर्षी केली होती. हाय क्वालिटी फोटोज गुगल फोटोजच्या क्लाउड स्टोरेजमध्ये मोफत साठवून ठेवण्याची सुविधा एक जून 2021 पासून बंद केली जाणार आहे. प्रत्येक गुगल अकाउंटला गुगलकडून 15 जीबीचं मोफत क्लाउड स्टोरेज दिलं जातं. युझर्सना आता त्यातच फोटो साठवावे लागतील किंवा गुगल वन सबस्क्रिप्शन घेऊन क्लाउड स्टोरेजसाठी पैसे मोजावे लागतील.

फोटोजच्या ठराविक रिझॉल्युशनलाच मोफत स्टोरेजची सुविधा दिली जाणार असून, आता गुगल अकाउंटमध्ये ( Google Account) कुठेही अपलोड केलेले फोटो एकाच क्लाउड स्टोरेज स्पेसमध्ये साठवले जाणार आहेत. गुगलचे हे बदल लागू होण्यापूर्वी गुगल फोटोजवरचे आपले फोटोज डाउनलोड कसे करून घ्यायचे, याबद्दलची ही माहिती उपलब्ध करून देत आहोत.

गुगलच्या क्लाउड बॅकअपमधून ( Google Cloud Backup) गुगल फोटोज डाउनलोड करून घेण्यासाठी अनेक मार्ग आहेत. वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या प्रकारच्या युझर्सना उपयोगी ठरतील. photos.google.com या वेबसाइटवर जाऊन एका वेळी एक अशा प्रकारे सर्व फोटोज डाउनलोड करणं हा सर्वांत सरळ मार्ग आहे ; मात्र ही खूप वेळखाऊ पद्धत आहे. तरीही ही सर्वांत ऑथेंटिक पद्धत आहे. प्रत्येक फोटो डाउनलोड करायचा नसेल , तर photos.google.com वर जाऊन तुमच्या गुगल अकाउंटला लॉगिन करावं. त्यानंतर open an image वर जाऊन वर उजव्या बाजूला असलेल्या three-dot menu वर क्लिक करावं. त्यानंतर download वर क्लिक करावं. इथे एका वेळी अनेक इमेजेसही सिलेक्ट करता येतात आणि एकत्र डाउनलोड करता येतात ; मात्र एकत्र डाउनलोड केलेल्या इमेजेस कॉम्प्रेस होऊन एका झिप फाइलमध्ये डाउनलोड होतात.

युझर्सनी गुगल फोटोजमध्ये वेगवेगळे अल्बम्स केले असतील , तर अल्बम्सनुसारही ते डाउनलोड करता येतील. ‘ albums’ या टॅबमध्ये ‘ View All Albums’ हा पर्याय निवडावा. तिथे त्यांना त्यांचं संपूर्ण कलेक्शन दिसेल. प्रत्येक अल्बमवर क्लिक करून वर उजव्या बाजूला असलेल्या three-dot menu वर क्लिक करावं आणि त्यानंतर ‘download all’ वर क्लिक करावं. त्यानंतर झिप फाइलमधून ते सगळे अल्बम्स डाउनलोड होतील.

गुगल फोटोजवर असलेले सगळेच फोटोज एकाच वेळी डाउनलोड कसे करायचे , ते आता पाहू या. त्यासाठी Google Takeout चा वापर करावा. Google Takeout हे असं टूल आहे , की ज्याद्वारे कीप नोट्स , मेल मेसेजेस , गुगल क्रोम हिस्ट्री अशा अनेक गुगल अॅप्समधली आपली माहिती युझर एक्स्पोर्ट करू शकतो.

सगळे फोटोज डाउनलोड करण्यासाठी takeout.google.com यावर जावं. आपल्या गुगल अकाउंटला लॉगिन करावं. त्यात ‘ Create a New Export’ वर क्लिक करावं. त्यात तुम्हाला गुगलच्या कोणकोणत्या सेवांमधला कंटेंट डाउनलोड करायचा आहे हे सिलेक्ट करता येतं. तुम्हाला फक्त फोटोजच डाउनलोड करायचे असतील , तर तेवढाच पर्याय सिलेक्ट करावा. ‘ select data to include’ या टॅबमध्ये ‘ deselect all’ वर क्लिक करावं. त्यानंतर Google Photos सिलेक्ट करावं. ‘ all photo albums included’ यावर क्लिक केलं , तर तुम्हाला एखादा विशिष्ट अल्बमही सिलेक्ट किंवा डीसिलेक्ट करता येऊ शकेल. अल्बम सिलेक्ट केल्यानंतर OK वर क्लिक करावं. त्यानंतर डेटा एक्स्पोर्टचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.

युझर्सना त्यांचा डेटा , फोटोज कशा पद्धतीने डाउनलोड करायचा , हे निवडता येतं. त्यांच्या ई-मेलवर डाउनलोड लिंक स्वीकारण्याचा पर्याय असतो. तसंच , ड्रॉपबॉक्स , वनड्राइव्ह किंवा बॉक्स अशा अन्य क्लाउड पर्यायांतही डेटा पाठवता येतो. सगळा डेटा एकाच वेळी एक्स्पोर्ट करायचा आहे , की ठरावीक दिवसांनी करायचा आहे , हे सिलेक्ट करता येतं. तसंच फाइलचा प्रकारही ठरवता येतो. डाउनलोड फाइलचा सर्वाधिक आकार किती असेल , हेही ठरवता येतं. म्हणजे युझरचा एकूण डेटा 12 जीबी असेल आणि मॅक्सिमम फाइल साइझ एक जीबी निवडली असेल , तर प्रत्येक एक जीबी फाइलसाठी एक अशा प्रकारे 12 डाउनलोड लिंक्स गुगलकडून पाठवल्या जातील.

हे सगळं झाल्यानंतर Create Export वर क्लिक करावं. त्यानंतर ‘ Google is creating a copy of files from Google Photos’ असा मेसेज दिसेल. त्यानंतर गुगल तुमचा बॅकअप तयार करायला सुरुवात करील आणि ते तयार झाल्यानंतर डाउनलोड लिंक्स पाठवील. यासाठी काही मिनिटं ते काही तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.