Ultimate magazine theme for WordPress.

‘वुहान’च्या प्रयोगशाळेतच चीनने केली जैविक अस्त्र म्हणून कोरोनाची निर्मिती !

सार्स कोरोनाविषाणूची (SARS) जागतिक साथ २०१५ मध्ये पसरण्यापूर्वीच चीनच्या लष्करी संशोधक आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी असे विषाणू म्हणजे नव्या युगातील जैविक अस्त्रे म्हणून वापरण्याचा कट आखल्याचे खळबळजनक वृत्त विकेन्ड ऑस्ट्रेलियन या दैनिकाने दिले आहे. चिनी संशोधकांनी लिहिलेल्या प्रबंधाचा हवाला त्यात देण्यात आला असून भविष्यात माणसांमध्ये विकार निर्माण करणाऱ्या विषाणूंच्या जोडीला असे विषाणू कृत्रिमरीत्या धूर्तपणे हाताळायचे, त्याचे अस्त्रात रूपांतर करायचे आणि त्याचा वापर करायचा असे कारस्थान रचण्यात आले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

सार्स विषाणूचे अनैसर्गिक उगमस्थान आणि मानवनिर्मित विषाणूंच्या नव्या पेशींचा जैविक अस्त्रे म्हणून वापर असे या प्रबंधाचे शिर्षक आहे. त्यातून तिसरे महायुद्ध जैविक अस्त्रांच्या माध्यमातूनच लढले जाईल हेच सूचित होते. या दैनिकाचे वृत्त ऑस्ट्रेलियातील news.com.au या संकेतस्थळाने दिले असून त्यात ऑस्ट्रेलियन व्यूहात्मक धोरण संस्थेचे कार्यकारी संचालक पीटर जेनिंग्ज यांची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. हा प्रबंध म्हणजे चीनच्या कारस्थानाचा आतापर्यंत मिळालेला भक्कम पुरावा ठरेल असे त्यांनी म्हटले आहे. चिनी संशोधक कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या प्रकारांकडे एक लष्करी आयुध म्हणून बघत होते आणि ती कशा पद्धतीने वापरता येतील याचा विचार करीत होते हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे हा प्रबंध विलक्षण महत्त्वाचा आहे. लष्करी वापरासाठीचे रोगकारक विषाणू चुकून बाहेर पडल्याच्या शक्यतेलाही पुष्टी मिळत आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञ रॉबर्ट पॉटर यांनी या प्रबंधाची कागदपत्रे बनावट नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.