Ultimate magazine theme for WordPress.

आता नवीन कोरोनाचा विषाणू हवेत ६ फुटापेक्षा अधिक परिसरात हवेत पसरतो

जगभरात उसळलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेतील विषाणूचे रौद्र आणि भंयकर रुप समोर आले असून आता कोरोनाचे विषाणू हवेत ६ फुटापर्यंत आणि त्याहून अधिकच्या परिसरात पसरतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ऍण्ड प्रिवेन्शनने(सीडीसी) हा दावा केला आहे. मुख्य म्हणजे, कोरोना संक्रमित रुग्णाच्या वाटे हवेत पसरणारे विषाणू तीन ते सहा फुटांपर्यंत अधिक प्रमाणात राहतात, असेही सीडीसीने नमूद केले आहे. मेडिकल जनरल लैसेंटने देखील या दाव्याला दुजोरा दिला आहे.

नेमके काय होते?

जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा तोंडावाटे सूक्ष्म द्रव्य कणांच्या मार्फत हवेत पसरतात. त्यातील काही कणांच्या मार्फत कोरोनाचा प्रसार होतो.

तोंडावाटे निघणारे मोठे द्रव्य कण हे काही सेकंद ते मिनिटे हवेत राहतात आणि नंतर नष्ट होतात. पण सूक्ष्म कणांचं वेगळे आहे. ते काही मिनीटे ते काही तास हवेमध्ये वा पृष्ठभागावर राहतात. त्यामुळे सूक्ष्म कणांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढतो, असे या नियमावलीत सांगण्यात आले आहे.

तर संक्रमणाच्या परिसरात व्यक्ती सहा फुटांच्या लांब असेल तर कोरोना होण्याचा धोका कमी असतो, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.