Ultimate magazine theme for WordPress.

लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-२०२० चे आयोजन करण्यात आलेले असून सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता मध्यप्रदेश आणि बिहार सारख्या राज्याने त्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पूढे ढकलल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात याबद्दल काही निर्णय घ्यावा, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

पुण्यामध्ये अभ्यास करत असणारे बरेच विद्यार्थी हे कोरोना लक्षणे असणाऱ्या लोकांच्या संपर्कात आलेले आहेत. किंबहुना बरेच विद्यार्थ्यांचा रिपोर्टही पॉझिटिव आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना कोरना ची लक्षणे आहेत पण भीतीपोटी ते डॉक्टर कडे गेले नाहीत. एक्झाम झाल्यानंतर जाऊ असा विचार करत आहेत हे खूप भयंकर आहे त्यामुळे राज्य शासनाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. दोन दिवसापूर्वीच एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्युने विद्यार्थ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले. आता आज आणखी एका विद्यार्थ्याचा कोरोंनामुळे मृत्यू झाला असून आम्हाला आमचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे आम्ही आपणाला विनंती करतो की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षेसंदर्भातील जो काही निर्णय आहे तो त्वरित जाहीर करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.