Ultimate magazine theme for WordPress.

अखेर मुंबई उच्च न्यायालायाच्या निर्देशानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा दिला आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चैकशी व्हावी म्हणून डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढत १५ दिवसांत सीबीआयला प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांची अडचण झाल्याने राजीनामा देणे अपेक्षितच होते. तशी शरद पवार चर्चा केल्यांनतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला असून त्यांनी तो स्विकारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.