Ultimate magazine theme for WordPress.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे सीबीआयला निर्देश

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी  करून १५ दिवसांत प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत. परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांनी जनहित याचिका दाखल केल्या होत्या. मात्र डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढत हे आदेश दिले आहेत.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, असा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला होता. या आरोपामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने एकच खळबळ माजली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.