Ultimate magazine theme for WordPress.

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पास करणार- शिक्षणमंत्री

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला असून विद्यार्थी आणि पालकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही परीक्षेविना उत्तीर्ण करण्याचा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

आपण कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळं आपण ऑनलाईन शिक्षणावर भर देत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न केला आणि मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं असलं तरी पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात आपण शाळा सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकल्या नाहीत.  तसेच सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता आता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं नाही. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही परीक्षेविना उत्तीर्ण करून पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.