Ultimate magazine theme for WordPress.

कोरोना झाल्याने सचिन तेंडुलकर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार दवाखान्यात दाखल

नुकताच कोरोनाग्रस्त झालेला माजी क्रिकेटपटू महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी दवाखान्यात दाखल झालो असल्याचे त्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विट मध्ये तो म्हणतो की, लवकरच मी हॉस्पिटलमधून बरा होऊन घरी परतेन असा विश्वास आहे. चाहत्यांनी त्याची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना, शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.

आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या, शुभेच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचं सचिननं आपल्या ट्वीटमधून आभार मानून सचिनने म्हटले आहे की, हिंदुस्थान वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या दशकपूर्ती निमित्त सर्व हिंदुस्थानी नागरिकांना आणि टीममधील माझ्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा. आज दहा वर्षांपूर्वी म्हणजे २ एप्रिल २०११ रोजी हिंदुस्थानने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.