Ultimate magazine theme for WordPress.

पुत्रप्राप्ती वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना संगमनेर न्यायालयाचा दिलासा

समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना संगमनेर न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून न्यायालयात या प्रकरणी हजर न राहण्याची मूभा इंदुरीकर महाराजांना देण्यात आली आहे.

संगमनेरच्या न्यायालात पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२ अंतर्गत खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने इंदोकीकर महाराजांना ७ ऑगस्ट रोजी कोर्टासमोर उपस्थित होण्यास सांगीतले होते. त्यावरील कोर्टाचे कामकाज पूर्ण झाले असून न्यायालयाने आज इंदोरीकरांच रिव्हीजन अपील मंजुर करत खालच्या कोर्टाची प्रोसेस इश्यु ऑर्डर रद्द करत इंदोरीकर महाराजांचा रीव्हिजन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

इंदोरीकर महाराज हे जाहिरात होईल असे काहीही बोलले नाहीत, तर ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्याच गोष्टी त्यांनी सांगितल्यामुळे महाराजांनी केलेलं वक्तव्य गुन्हे स्वरुपात बसत नाही. तसेच महाराजांचा हेतू वेगळा होता, असे स्पष्टीकरण विधिज्ञ के.डी. धुमाळ यांनी न्यायालयासमोर दिल्याने पूत्रप्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यासाठी इंदुरीकर महाराज यांनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं, अखेर न्यायालयाने इंदुरीकर यांचे अपील मंजूर केले आहे. या निकालानंतर इंदुरीकर समर्थकांनी पेढे वाटले आहेत, तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यावर आणखी कडक भूमिका घेत, आपण या निकालाला आव्हान देण्यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.