Ultimate magazine theme for WordPress.

त्या बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळविणाऱ्या २५९ जणांना गुन्हेशाखा अटक करणार

औरंगाबाद : ट्रंपोलिन आणि टंबलिन या खेळाचे बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळविणाऱ्या २५९ बोगस खेळाडूंना येत्या काही दिवसांत गुन्हेशाखा अटक करणार असून पोलिसांनी आता त्यांचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद क्रीडा उपसंचालक कार्यालयातर्फे ट्रंपोलिन आणि टॅबलिन खेळाच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावरील सामन्यात सहभाग घेतल्याचे दाखवून २५९ खेळाडूंना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते. तत्कालीन क्रीडा अधिकारी भावराव रामदास वीर, क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रय महादवाड यांनी या प्रकरणाचा मास्टरमाइंड अंकुश प्रल्हाद राठोड आणि एजंटशंकर शामराव पतंगे यांच्याशी संगनमत करून पैसे घेऊन हे प्रमाणपत्र दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चारही आरोपी सध्या गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, आरोपी पतंगे आणि राठोड यांनी दुसऱ्या एका खेळाच्या स्पर्धांचे निकाल कसे मिळविले आणि खेळाडूंना कशाप्रकारे प्रमाणपत्र वाटप केले याची कसून चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान २५९ पैकी ७१ जणांनी त्यांचे खेळाडूचे प्रमाणपत्र खरे असल्याचा दावा न्यायालयांत केला आहे. यातील अनेकजण सरकारी सेवेत आहेत. काहींनी अटकपूर्व जामीन मिळविला आहे.७१ जणांची नावे एफआयआरमध्ये नव्हती.२५९ आरोपीपैकी कुणीही एकाही स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. एवढेच नव्हे तर त्यांना प्रमाणपत्र मिळविलेल्या वर्षात एकही राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा झाली नाही. त्यांची बनवेगिरी स्पष्ट झाली. पोलीस त्यांना अटक करणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.