Ultimate magazine theme for WordPress.

महाराष्ट्रात करोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल ३ लाखांवर गेल्याने चिंता वाढली

मुंबई : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १६६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख वाढून नवा उच्चांक गाठल्यानंतर आजही रुग्णांची संख्या चिंता वाढवणारीच आहे. करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात आजरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आज हाती आलेले करोनाचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.

राज्यात आज ३५ हजार ७२६ नवीन रुग्ण सापडले असून शनिवारी १६६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २. ०२ टक्के इतका झाला असून दिवसभरात १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख १४ हजार ५७९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता तीन लाखांवर गेली असून शनिवारच्या आकडेवारीनुसार सध्या ३ लाख ०३ हजार ४७५ सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.