Ultimate magazine theme for WordPress.

लोकसेवा आयोगाच्या टोल-फ्री नंबरवर आक्षेपार्ह संभाषण केल्यास कार्यवाही होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवारांना आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात अली असून यावर केवळ येणा-या अडचणी/ शंका निवारणासाठी मदतकेंद्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

मात्र सदरील टोल फ्री क्रमांकावर मदतीसाठी संपर्क केल्यानंतर काही उमेदवार मदतकेंद्रातील कर्मचा-यांशी अर्वाच्च भाषेत वाद घालत असल्याचे तसेच कर्मचा-यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय सेवेत प्रवेशासाठी इच्छूक असणा-या उमेदवारांकडून अशा प्रकारच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे मदतकेंद्र सुरु करण्याच्या आयोगाच्या हेतूस बाधा पोहोचत आहे. मदत केंद्रावरील दूरध्वनी संभाषणाचे ध्वनीमुद्रण करण्यात येत असल्याने उमेदवारांचे आक्षेपार्ह संभाषण आयोगाच्या कार्यालयाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल. शिवाय अशा प्रकारचे बेशिस्त वर्तन आयोगाच्या कर्मचा-यांवर दबाव आणण्याच्या तसेच आयोगाच्या कामात गैरवाजवी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न समजून संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. 

आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या अनुषंगाने येणा-या तांत्रिक अडचणींचे निराकरण तसेच सर्वसाधारण स्वरुपाची माहिती देण्यात येत आहे. आयोगाच्या कार्यक्षेत्राबाहेरील किंवा शासन स्तरावरील प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण आयोगाच्या कार्यालयास करणे सद्यस्थितीत तरी शक्य होणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे.

 

प्रसिद्धीपत्रक पहा

 

Leave A Reply

Your email address will not be published.