Ultimate magazine theme for WordPress.

राज्यात दिवसभरात ३६ हजार ९०२ करोनाबाधितांची वाढ तर ११२ रूग्णांचा मृत्यू

राज्यातील करोना संसर्ग आता दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत चालला असून दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवार (दि.२६) रोजी दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन करोनाबाधित आढळून आले. तर ११२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यू दर २.४ टक्के एवढा असून राज्यात सध्या २ लाख ८२ हजार ४५१ सक्रिय केसेस आहेत.

दरम्यान रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमाबंदी लागू करण्याचा निर्णय आज घेतला असून वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील केली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.