Ultimate magazine theme for WordPress.

मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाल्याने आता निकालाकडे लक्ष

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील असणाऱ्या मराठा आरक्षण प्रकरणाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले असून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात घटनात्मक पीठासमोर सुरू असलेले युक्तिवाद नुकतेच पूर्ण झाले आहेत.

गेल्या सलग दहा दिवसांपासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरून युक्तिवाद सुरु होते. १०२ व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत, तसेच ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेबाबत इंद्रा साहनीसह आणि निकालाचे पुनर्विलोकन आवश्यक आहे की नाही, याबाबत युक्तिवाद करण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक पीठाने निकालाची तारीख राखून ठेवली असून महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील अशा मराठा आरक्षण प्रकरणाचा निकाल कधी लागतो याकडे अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.