Ultimate magazine theme for WordPress.

डॅशिंग महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांची काल गोळी झाडून आत्महत्या

नागपूर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून परीक्षित असलेल्या आणि हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काल गोळी झाडून आपल्या निवासस्थानी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करा. माझ्यासोबत जे घडले ते इतरांसोबत घडू नये असे लिहलं आहे. तसेच आत्महत्या करण्यापुर्वी रेड्डी, अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याग्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केलेल्या तक्रारी अर्जात पवनसंराक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी म्हंटले असून दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत, याचा खुलासा केला असल्याचे समजते.

दरम्यान विनोद शिवकुमार हे रेल्वेद्वारे प्रवास करून पहाटेच्या सुमारास ते नागपूर रेल्वे स्थानकातून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमरावती एलसीबी पथकाने नागपूर रेल्वे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून शिवकुमार यांना ताब्यात घेतले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.