Ultimate magazine theme for WordPress.

इंग्लंडला मोठा धक्का; कर्णधार जखमी झाल्याने आता एकही सामना खेळणार नाही

पुणे : दुसरा एकदिवसीय सामना सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला असून इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आता या मालिकेतील एकही सामना खेळू शकणार नसल्याचे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला आणि बोटाला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की त्याला चार टाके पडले आहेत. त्यानंतरही मॉर्गन हा मैदानात उतरला परंतु ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळेच इंग्लंडचा कर्णधार आता या मालिकेतील एकही सामना खेळू शकणार नाही.

मॉर्गन खेळणार नसल्यामुळे आता इंग्लंडचे कर्णधारपद कोणाकडे जाणार, याची उत्सुकता सर्वांनाच असून मॉर्गन खेळत नसताना भारताविरुद्धच्या अन्य दोन सामन्यांसाठी इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलरकडे सोपवण्यात येणार आहे. मात्र त्याचबरोबर मॉर्गनच्या जागी आता इंग्लंडच्या संघामध्ये लायम लिव्हिंगस्टोनला संधी देण्यात आली असून संधी मिळालेला लायम कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.