Ultimate magazine theme for WordPress.

चार दिवसांचा आठवडा करण्याचे सरकारच्या विचाराधिन नाही- कामगार मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सहा दिवस कामाचे आणि एक दिवस सुटी या चौकटीत नोकदारांचे काम सुरू असते. मात्र चार दिवसांचा आठवडा आणि तीन दिवस सुटी याची चर्चा नोकदार वर्गात चवीने होत असतानाच केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगावार यांनी चार दिवसांचा आठवडा करण्याचा विचार सरकारचा नसल्याचे गंगावार यांनी स्पष्ट करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कामगार मंत्री गंगावार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करून आठवड्यातून चार दिवस काम किंवा चाळीस तासांच्या कामाच्या प्रक्रियेविषयी कोणतीही योजना सरकारने तयार केलेली नाही. चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार पाच दिवसांचा आठवडा आणि दररोज साडेआठ तास काम केले जात असून चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशीं सातव्या वेतन आयोगाने कायम ठेवल्या असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.