Ultimate magazine theme for WordPress.

चार्जरशिवाय फोन देणे महागात : नामांकित Appel कंपनीला १४ कोटींचा दंड

चार्जरशिवाय आयफोनची विक्री करणे अॅपल कंपनीला चांगलच महागात पडलं आहे. ब्राझीलमधील ग्राहक संरक्षण संस्थेने (प्रोकॉन- एसपीनं) तब्बल १४ कोटींचा दंड ठोठावला असून कंपनीने आयफोन-१२ सोबत चार्जर न दिल्यानं कंपनीला हा दंड सुनावण्यात आला आहे.
हा निर्णय घेताना पर्यावरणास फायदा होऊन चार्जरमुळे निर्माण होणार ई-कचरा कमी करण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतल्याचंही बचाव कंपनीने केल्यानंतर पण त्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा फायदा होतोय, हे सिद्ध होऊ शकलं नाही, असं प्रोकॉन-एसपीनं म्हटलं असून  मोबाइल हँडसेटसह चार्जर दिला जात नाही, तरीदेखील फोनची किंमत कमी का केली नाही, असा प्रश्नही प्रोकॉन-एसपीनं उपस्थित केला  असून चार्जरशिवाय आणि चार्जरसह मोबाइलची किंमत किती असेल याची संपूर्ण माहिती कंपनीने दिलेली नाही. त्यामुळे ‘दिशाभूल करणारा प्रचार, चुकीच्या परिस्थितीत आणि चार्जरशिवाय डिव्हाइसची विक्री’ केल्याचा आरोप कंपनीवर असल्याने कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

अधिक बातमी वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.