Ultimate magazine theme for WordPress.

धोनीचा विक्रम मोडून ठरला टी-२० च्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार

अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेत जागतिक क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम नोंदवला गेला असून तीन सामन्यांच्या मालिकेत अफगाणिस्तानने ३-० असा विजय मिळवला. तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा ४७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानने ७ बाद १८३ धावा केल्या तर झिम्बाब्वेला ५ खेळाडूच्या बदल्यात केवळ १३६ धावा करता आल्या. या सामन्यातील विजयासह अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगान याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मागे टाकत टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकण्याचा धोनीच्या नावावर असलेला ७२ पैकी ४१ सामन्यात विजय मिळवलेला विक्रम मोडीत काढून अफगानने हा विक्रम मागे टाकत ५२ पैकी ४२ लढतीत विजय मिळवला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.