Ultimate magazine theme for WordPress.

राज्यात करोनाचा विस्फोट : ३० हजारांहून अधिक रुग्णवाढ तर ९९ जणांचा मृत्यू

दिवसेंदिवस राज्यात करोनाचा कहर वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून राज्यात आज करोना बाधित रुग्णवाढीची धडकी भरवणारा आकडा समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून आजचा आकडा पाहिल्यास राज्यात करोनाचा विस्फोट होत असल्याचे स्षष्ट झाले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३० हजार ५३५ एवढ्या नव्या रुग्णांचे निदान झाले असून काल ही रुग्णांची संख्या २७ हजार १२६ एवढी होती. सदरील तुलनेत ही वाढ ३ हजार ४०९ ने अधिक असून गेल्या २४ तासांमध्ये एकूण ११ हजार ३१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख १० हजार १२० वर जाऊन पोहचली आहे.

अधिक बातमी वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.